बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व इनस्पेक्शन (डिएमआय) कृषी मंत्रालय भारत सरकारचे अॅगमार्क नेट योजने अंतर्गत एक संगणक संच (मॉडेम, प्रिंटर, युपीएस) व इंटरनेट विनामुल्य पुरविणेबाबत केंन्द्र सरकारची योजना असून ती एन. आय. सी. नवी दिल्ली यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्यांचा प्रमूख उद्देश भारतातील महत्वाचे बाजार समितीचे संगणकीकरण करून बाजार भाव, आवक या माहितीची राष्ट्रीय स्तरावर देवाण घेवाण करणे हा आहे. त्या अनुषंगाने समितीला पणन मंडळाचे पत्रान्वये एक संगणक संच समितीला बिनामूल्य प्राप्त झालेला आहे. सदर पत्रानुसार दैनंदिन अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
