बाजार विभाग

नियमन व अनुज्ञप्ती

बाजार समितीच्या बाजार आवारातील वेगवेगळे बाजार घटक जसे अबते, व्यापारी, मापाडी, हमाल, वाहतुकदार, खरेदीदार इ. घटकांना नवीन अनुज्ञप्ती देणे व नुतनीकरण करणे व बाजार समितीची रचना व उपविधी बाबतची लेखापाल हे सदर विभागाचे प्रमुख असून ऐक पर्यवेक्षक व दोन कनिष्ठ लिपिक यांच्यामार्फत सदर विभागाचे कामकाज पहिले जाते

मालमत्ता शाखा

बाजार समितीच्या मालकीच्या सर्व मालमत्ता, दीर्घ मुदतीच्या लीजवर, भाडयाने देणे, तसेच मालमत्तांचे हस्तांतरण इ. बाबी या विभागाकडून पाहिल्या जाते. पर्यवेक्षक या विभागाचे प्रमुख असून दोन कनिष्ठ लिपिक व एक सहाय्यक असून त्यांच्याद्वारे या विभागाचे कामकाज पाहिले जाते

आस्थापना/प्रशासन शाखा

बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचे आस्थापना विषयक बाबी तसेच बाजार समितीच्या सभा, वाहन व्यवस्था इ. कामे सदर

अभियांत्रिकी विभाग

बाजार समितीतील सर्व विकास कामे व बाजार समितीच्या मालमत्तांची देखभाल व दुरूस्तीचे कामकाज अभियांत्रिकी विभागामार्फत पार पाडले जाते. अभियांत्रिकी विभाग या बाजार समितीमध्ये उपलब्ध नसून. आवश्यक्तेनूसार खासगी सेवा पुरवठा द्वारा मार्फत या विभागाचे कामकाज पहिले जाते.

लेखा शाखा

बाजार समितीतील आर्थिक बाबीविषयीचे सर्व कामकाज लेखाशाखेमार्फत पार पाडले जाते यामध्ये वेतन, सर्व देयके प्रदान करणे, बाजार समितीची अर्थिक पत्रके तयार करणे, अंदाज पत्रके तयार करणे इत्यादींचा समावेश होतो. लेखापाल हे सदर विभागाचे प्रमुख असून. हंगामी लेखापाल सहाय्यक त्यांना मदतीस मनुन आहे. या विभागाची संपूर्ण जबाबदारी लेखापालयांच्या कडे आहे.

वसुली विभाग

बाजार समितीस येथे असलेल्या थकीत रक्कमांच्या वसुलीचे, आयात-निर्यात तसेच दैनंदिन बाजारभाव जमा व प्रसारीत करणे ही कामे सदर विभागाकडून पाहिली जातात, मुख्यालय तसेच उपबाजार येथील कापूस व धान्य विभागातील विभाग प्रमुख यांच्याकडे वसुली विभागाची जबाबदारी असून याबाबतचे संपूर्ण कामकाज त्यांच्यामार्फत पार पाडले जातात.

सुरक्षा विभाग

बाजार समितीची सर्व बाजार आवारे व मालमत्ता यांचे रक्षण करणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, चोरी व इतर अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून दक्षता घेणे इ. कामे सदर विभागाकडून पार पाडली जातात. मुख्यालय येथे धान्य विभाग प्रमुख तसेच उपशाखा येथे पर्यवेक्षक या विभागाचे प्रमुख असून हंगामी कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत ही जबाबदारी पार पाडली जाते.

माहिती व तंत्रज्ञान विभाग

बाजार समितीच्या बाजार आवारातील आवक नोंद करणे, आकारणी पत्रके तयार करणे, कर्मचारी वेतन इ. बाबी साठी बाजार समितीकडून संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली असून सदर संगणक प्रणालीचे व्यवस्थापन व बाजार समितीच्या मालकीचे संगणक प्रिंटर इ. ची दुरुस्ती व देखभाल हे काम सदर विभागाकडून पाहिले जाते. संगणक साहित्य देखभाली करीत खासगी सेवा पुरवठादार अभियांत्रिकाचे सेवा घेतली जाते.

दक्षता विभाग

नियमनाखालील शेतमालाची होणा-या अवैध वाहतूकीस आळा घालये, तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे इ. कामकाज केले जाते. मुख्यालय व उपशाखा येथील धान्य विभाग प्रमुख या विभागाचे प्रमुख आहे.

विधी शाखा

बाजार समितीच्या वतीने विविध न्यायालयातील प्रकरणामध्ये बाजार समितीची बाजू मांडाजे इ. कामे सदर विभागाकडून केली जातात. विधी अधिकारी हे सदर विभागाचे प्रमुख आहेत.