सेलू येथे उपबाजार दि. १७ एप्रिल १९८२ ला अधिसुचनेप्रमाणे जाहीर झालेला असुन, सेलू येथे १.४० हे.आर. सेलू धान्य बाजार लागुनच कापुस व बैलबाजार यार्ड ३.७९ हे. आर. जमीन सेलू उपबाजार प्रमाणे स्वतःचे मालकीचे जागेवर कार्यरत आहे. तेथे शेतकऱ्यांना तारण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच क्रेंद्रिय ग्रामीण गोदाम योजने अंतर्गत २५० मे. टन क्षमतेचे गोदाम शासनाचे अनुदान अर्थसहाय योजनेतून बांधकाम केलेले असून गोदाम कम ऑफीस, लिलाव शेड, संडास व विद्युती करण तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
लेखापरिक्षण कालावधीत निदर्शनास आलेले किरकोळ स्वरूपाचे तथा दुरूस्ती करून घेण्यासारख्या दोषांची दुरूस्ती वेळीच करण्यात आलेली असुन असे दोष की ज्यांची प्रत्यक्षात वेळीच दुरुस्ती होवु शकली नाही असे दोष या लेखापरिक्षण अहवालात भाग 'अ', 'ब' आणि 'क' मध्ये सविस्तर नमुद करण्यांत आलेले आहे.
